संस्थेचे आज जे रूप दिसत आहे ते मूर्त स्वरूपात आणण्यासाठी प्रारंभी, संस्थेच्या आर्थिक अडचणीच्या काळात, येथील सुशिक्षित महिलांनी नाममात्र वेतनावर अध्यापनाचे कार्य केले आहे. त्यावेळच्या प्रतिकूल परिस्थितीतून जाण्यासाठी कै. श्री. अण्णा नाबर तसेच कै. सुधाताई साठे यांच्यासारख्या संस्थेच्या असंख्य कार्यकर्त्यांचे योगदान अमूल्य आहे.
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गणेशपथ शाळा :-या शाळेच्या संबंधात सौ सुषमा भालचंद्र लिमये, मुख्याध्यापिका, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गणेशपथ, यांनी दिलेली माहिती अशी आहे-गणेशपथ जवळ मिडल क्लास गव्हर्मेंट सर्व्हंट्स ची वस्ती होती. या भागात सौ कर्वे आणि सौ. सरवटे या दोन्ही शिशुविहार नावाची, शाळा सौ कर्वे यांच्या घरात चालवीत होत्या. दिनांक 1 मे 1968 रोजी राष्ट्रीय शिक्षण संस्थेची स्थापना झाल्यावर थोड्याच कालावधीत शिशुविहार ही शाळा संस्थेकडे संचालन करण्यासाठी सुपूर्द करण्यात आली. त्यावेळी रुपये पस्तीस या मानधनावर
राष्ट्रीय शिक्षण संस्थेने, डोंबिवली परिसरातील शिक्षण प्रेमी, परंतु कुटुंबासाठी अर्थार्जन करण्याची गरज असलेल्या विद्यार्थी वर्गासाठी एक रात्र महाविद्यालय सुरू करण्याचे ठरविले. दिनांक 9 /7 /98 पासून महाविद्यालय सुरू करण्याची अनुमती मिळाली प्रत्यक्षात शैक्षणिक वर्ष 98 99 पासून हे महाविद्यालय सुरू झाले. सुरुवातीला प्राध्यापक नंद प्राचार्य म्हणून काम पाहत होते. विद्यार्थी वर्गाचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला.
डोंबिवलीच्या पश्चिम भागातील जय हिंद कॉलनी जवळील अरुणोदय या भागात एक शिक्षण प्रेमी नागरिक श्री सुभाष रेंघे यांच्या निवासस्थानी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय शाळेची स्थापना 1970 मध्ये झाली. डोंबिवली पश्चिम या भागातील राष्ट्रीय शिक्षण संस्थेची ही दुसरी शाळा सुरुवातीला वर्ग श्रीयुत रेघे यांच्या घरीच भरत.
डोंबिवलीच्या पश्चिम भागात तीस वर्षापूर्वी वस्ती वाढू लागल्यावर तेथे शाळेची गरज भासू लागली. विष्णू नगर भागात विद्याप्रेमी नागरिक श्री. अंतरकर यांच्या राहत्या घरी शिशू विकास मंदिर नावाने शाळा सुरू होती. राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री. मोकाशी यांनी त्यांचं हे काम पाहिलं व ही शाळा, 1970 मध्ये राष्ट्रीय शिक्षण संस्थेमध्ये सामावून घेतली. नामवंत उद्योजक श्रीयुत नाख्ये यांच्या गाळ्यात ही सुरुवातीला वर्ग भरवले जात होते श्री वाणी व श्रीयुत मोकाशी यांच्या प्रयत्नाने कै. नवरे यांच्या मालकीचा एक प्लॉट ती मध्ये
1967 पासून दतनगर भागातील सामाजिक कार्यकर्त्या सौ सुधाताई साठे त्यांच्या राहत्या घरी शाळा चालू होती. 1969 सालीही शाळा राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या परिवारातील एक घटक बनली. श्री. मुंशी आणि कै. मोकाशी प्रयत्नामुळे दत्तनगर भागात एक सरकारी प्लॉट शाळेसाठी मिळाला निधी उपलब्ध झाल्यावर संस्थेने शाळेचे बांधकाम टप्प्याटप्प्याने पूर्ण केले. दत्तनगर च्या या शाळेसाठी कै. सुधाताई साठे यांनी अविरत परिश्रम केले आहेत.
डोंबिवली पूर्वेकडील रामनगर विभागात संध्याताई रानडे यांच्या घरात एक शाळा सुरू होती. हे नावही स्वामी विवेकानंद विद्यामंदिर असेच होते. कैलासवासी मामा फाटक यांच्या प्रयत्नाने रामनगर येथील राणी ट्रस्टच्या इमारतीत 1968 पासून ही शाळा भरू लागली होती. दादाजी दादाजी आणि कंपनीचे मालक श्री रामकृष्ण राणे त्यांच्या मालकीचा पंधरा हजार रुपयात घेऊन तेथे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर ची “ गुरु गोविंद सिंह भवन” ही वास्तू उभारण्यात आली. ही जमीन राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या पूर्ण मालकीची आहे.
गणेशपथ जवळील मिडल क्लास गव्हर्मेंट सर्व्हंट्स ची वस्ती असलेल्या भागात शाळा बांधण्यासाठी 99 वर्षांच्या कराराने एक प्लॉट संस्थेला मिळाला. याबरोबरच येथे सौ कर्वे यांच्या घरी सुरू असलेली शिशुविहार ही शाळा हे संचालनासाठी सुपूर्द करण्यात आली. सध्या गोपाळ नगर ची शाळा ही याच इमारतीत भरवण्यात येते.
1मे 1968 मध्ये संस्थेच्या स्थापनेबरोबरच डोंबिवली पूर्वेकडे गोपाळनगर भागात बारा मे 1968 रोजी, श्रीयुत मा. गो. तथा बाबासाहेब मोकाशी यांच्या घरकुल या निवासस्थानी त्यांच्या गच्चीवर पाच वर्ग खोल्या बांधून या शाळेची सुरुवात झाली.
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर डोंबिवली दत्तनगर शाळेच्या प्रांगणात रंगणार स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला व पुरस्कार प्रदान सोहळा/2020
वैदिक काळापासूनच शिक्षकांना गुरुचे स्थान आहे. त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून, त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. शिक्षक वृंद हा राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा पायाभूत घटक आहे.
दिनांक 30 जुलै 2019 रोजी राष्ट्रीय शिक्षण संस्था, डोंबिवली संचालित स्वामी विवेकानंद कला व वाणिज्य रात्र महाविद्यालय व मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने CBCS - "चॉईस बेस क्रेडिट सिस्टीम" ("CHOICE BASE CREDIT SYSTEM") च्या संदर्भात एक दिवसीय माहिती सत्र डॉ हेडगेवार सभागृह, राणा प्रताप भवन, डोंबिवली येथे आयोजित करण्यात आले होते.
एकदिवसीय परिसंवाद : चॉईस बेस क्रेडिट सिस्टीम
शिक्षण पद्धतीत सनातन भारतीय परंपरा आणि तंत्रज्ञान यांची सांगड आवश्यक
राष्ट्रीय शिक्षण संस्थेची सुवर्ण वाटचाल
राष्ट्रीय शिक्षण संस्था राणाप्रताप भवन, पं. दीनदयाळ उपमार्ग, डोंबिवली (प.)
0251-2410100
[email protected]